कोरोनापासून आपले संरक्षण, डॉक्टर, नर्स आदी आरोग्यसेवकांशिवाय होऊ शकत नाही. अत्यंत घातक स्थितीमध्ये, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यसेवक तासंतास काम करत आहेत. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्त्यव्य आहे. ते सुरक्षित राहू शकतात ,जर त्यांना उच्च दर्जाचे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट'(ग्लव्स, मास्क्स, गाऊन ,हेल्मेट,डोळे संरक्षक चष्मा इत्यादी) उपलब्ध असेल तर. हे संरक्षक साहित्य प्रत्येक रुग्णासाठी नव्याने वापरावे लागते
काय आहे वस्तुस्थिती?
भारतामध्ये अशा संरक्षक साहित्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक आरोग्यसेवकांना कामचलाऊ साहित्य वापरावे लागत आहे. विश्वास बसणार नाही , काही सेवक मोठ्या आकाराच्या ‘बायोडिग्रेडेबल’ पिशव्या चेहरा झाकण्यासाठी वापरत आहेत . म्हणजेच त्यांच्या सुरक्षेचे बारा वाजले आहेत!
का आहे तुटवडा ?
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण, केरळमध्ये, ३० जानेवारी ला सापडला. लगेच सरकारने दुसऱ्या दिवशी,हे संकट लक्षात घेऊन संरक्षक साहित्याचा साथ करण्यासाठी पावले उचलायला हवी होती. पण तसे झाले नाही.
कोरोनाचे गांभीर्य संरक्षक साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या लक्षात आले होते. १२ फेब्रुवारी ला, या (१५०) कंपन्यांच्या संघटनेने , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला,पहिल्यांदा, अशा संरक्षक साहित्याच्या स्टँडर्ड्स/गुणवत्तेचे निकष यांच्या गाईडलाइन्स देण्याची विनंती केली. महिनाभर या कंपन्यांनी अनेक चकरा मारल्या, शेकडो इमेल्स लिहले ,इतर देशांनी असे संरक्षक साहित्य निर्यात करणे बंद केले आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले, पण केंद्र सरकारने काही त्या गाईडलाइन्स दिल्या नाहीत. (त्या दिल्या असत्या तर अर्थात असा तुटवडा निर्माण झाला नसता). विशेष म्हणजे २७ फेब्रुवारी ला ,जागतिक आरोग्य संघटनेने, ‘संरक्षक साहित्याचा जगातील सध्याचा साठा पुरेसा नाही. मागणी वाढत चालली असल्यामुळे अधिक तुटवडा निर्माण होईल’ अशा प्रकारची पूर्वसूचना दिली होती. तरीही सरकारला जाग आली नाही.
शेवटी, कोरोना चा प्रसार अटळ आहे हे लक्षात आल्यावर, १८ मार्च ला म्हणजे पहिला रुग्ण सापडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी, आरोग्य मंत्रालयाने बैठक घेतली! आणि संरक्षक साहित्य निर्मितीविषयी निर्णय घेतला. त्यात हि घोळ घातला आहे असं समोर आले आहे. संरक्षक साहित्य निर्माण करण्याची क्षमात असणाऱ्या सर्व कंपन्यांना अद्याप ऑर्डर देण्यात आलेली नाही. मोजक्याच कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. गरजेइतके साहित्य निर्माण होण्यासाठी महिनाभर लागू शकतो हे लक्षात घेता, सरकारने अक्षम्य दिरंगाई केली आहे, अजूनही करत आहेत!
संरक्षक साहित्याची निर्यांतबंदी
पहिला रुग्ण आढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी,३१ जानेवारी, ला सरकारने संरक्षक साहित्याच्या निर्यातीवर बंदी आणली. परंतु लगेच ८ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारीला सरकारने ८-१० घटकांबाबत ती उठवली देखील! २७ फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिल्यानंतर ही , बंदीचा पुनर्विचार केला गेला नाही. निर्यातबंदी ची अधिसूचना काढण्यासाठी १९ मार्च पर्यंत सरकारने वाट पाहिली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात संरक्षक साहित्याची आणि त्याच्या कच्च्या मालाची निर्यात केली गेली.
आता संरक्षक साहित्याचा तुटवडा आहे, इतर देशांनी त्या देशांमधून होणाऱ्या निर्यातीवर बंदी आणली आहे, कच्चा मालाची हि वानवा आहे.
तर पंतप्रधानांनी आरोग्य सेवकांसाठी टाळ्या, थाळ्या , शंख वाजवण्याचे आवाहन केले, पण प्रत्यक्षात आरोग्य सेवकांचा जीव धोक्यात टाकला आहे. संरक्षक साहित्याअभावी आरोग्य सेवकांचे मृत्यू झाल्यास त्यासाठी पंतप्रधानच जबाबदार असतील यात शंका नाही.
टेस्ट किटचा देखील तुटवडा
तज्ञांच्या मते, केवळ विलगीकरण (लोकांनी एकमेकांचा संपर्क टाळणे) कोरोना थांबविण्यासाठी पुरेसे नाही, तर युद्धपातळीवर संशयित रुग्ण तसेच रँडम पद्धतीने टेस्टिंग (कोरोना संबंधित आरोग्य चाचणी) झाले तरच कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लावता येतो. दक्षिण कोरिया, टर्की यासारख्या देशांनी ते केले म्हणून प्रसार रोखण्यास यश आले आहे. तर इटलीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम इटली ला भोगावा लागत आहे. भारत देखील इटली च्या मार्गावर आहे. आतापर्यँत केवळ १५-२० हजार लोकांची टेस्ट झाली आहे. भारतात रुग्णांचा अधिकृत आकडा कमी आहे त्यामागे मुळात टेस्टिंग कमी लोकांचे झाले हे कारण आहे असे म्हटले जाते.
टेस्ट केलेल्या लोकांचा आकडा कमी असण्याचे कारण म्हणजे टेस्ट किट ची कमतरता हे आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक कंपन्यांनी सरकारकडे टेस्ट किट निर्माण करण्यासाठी परवानगी मागितली. ती सरकारने तब्बल महिनाभर दिली नाही. १८ मार्च ला गुजरात मधील एका कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. इतर कंपन्या पात्र असतानाही केवळ एकाच कंपनीला हि परवानगी देण्यात आली आहे.
इतर देशांकडून असे किट मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि आता परवानगी दिल्यावर किती वेगाने आणि किती किट उपलब्ध होतील याची खात्री नाही.
आपले भविष्य खरोखर रामभरोसे आहे. जे गांभीर्य राहुल गांधी आणि संरक्षक साहित्य व टेस्ट किट निर्माण करण्याऱ्या कंपन्यांना ३० जानेवारीला आले, ते गांभीर्य, केंद्र सरकारला तब्ब्ल दीड महिने उशिरा म्हणजे १८ मार्च व त्यानंतर आले. या संकटाला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी आपल्याकडे अख्खा फेब्रुवारी महिना होता. पण तो केंद्र सरकारच्या बेफिकिरीमुळे अक्षरशः वाया गेला. म्हणूनच हे सरकार गुन्हेगार आहे!
आपल्या पुढ्यात काय मांडून ठेवले आहे हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
-भाऊसाहेब आजबे
संदर्भ
https://timesofindia.indiatimes.com/india/Healthcare-workers-face-crisis-of-protective-gears/articleshow/74740534.cms
https://scroll.in/article/956866/investigation-crucial-coronavirus-gear-supply-clouded-by-allegations-of-government-malintention
https://caravanmagazine.in/health/india-did-not-stockpile-covid-protective-equipment-health-workers-despite-clear-who-guidelines
https://m.timesofindia.com/india/companies-wait-weeks-for-coronavirus-test-validation/amp_articleshow/74701811.cms
(सदर लेख मॅक्समहाराष्ट्र मध्ये (२४ मार्च २०२०) प्रकाशित झाला आहे.https://www.maxmaharashtra.com/news-update/coronavirus-crisis-shows-indias-narendra-modi-governance-failure/79694/)
लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर ब्लॉग चे अपडेट्स मिळतील.
ट्विटर- @bhausahebajabe
फेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/
यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE